esakal | यापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजारांची एफडी ! भोयरेच्या सरपंचाची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Daughter

अलीकडे महिलांवरील अत्याचार, मुलगी नको मुलगा हवा म्हणून होणारी स्त्री-भ्रूणहत्या अशा विकृत घटनांच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन जगभरात साजरा करण्यात आला. मात्र भोयरे (ता. मोहोळ) या गावात, यापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्‍स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील, अशी घोषणा येथील नूतन सरपंच बाळकृष्ण साठे यांनी करून "मुली वाचवा'चा संदेश देत महिलांना महिला दिनाची मोठी भेट दिली. 

यापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजारांची एफडी ! भोयरेच्या सरपंचाची घोषणा

sakal_logo
By
रमेश दास

वाळूज (सोलापूर) : अलीकडे महिलांवरील अत्याचार, मुलगी नको मुलगा हवा म्हणून होणारी स्त्री-भ्रूणहत्या अशा विकृत घटनांच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला दिन जगभरात साजरा करण्यात आला. मात्र भोयरे (ता. मोहोळ) या गावात, यापुढे जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्‍स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील, अशी घोषणा येथील नूतन सरपंच बाळकृष्ण साठे यांनी करून "मुली वाचवा'चा संदेश देत महिलांना महिला दिनाची मोठी भेट दिली. 

भोयरे येथे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांच्यातर्फे 8 मार्च हा जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या माधुरी माळी व लक्ष्मी ताकमोगे यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी ज्या महिलांना फक्त मुलीच आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी साक्षी पाटील, ज्योती थोरबोले, स्वाती महाजन, संस्कृती चव्हाण, प्रांजल पाटील, रंजना कुलकर्णी, अनिता सरदेशमुख, उमा कवडे या महिलांनी व ग्रामसेवक सोमनाथ सोनवणे यांनी मुलांपेक्षा मुलीच कशा श्रेष्ठ आहेत यावर आपले मनोगत व्यक्त केले. 

या वेळी मार्गदर्शन करताना "महिला दिन साजरा करून उपयोग नाही, तर महिलांसाठी काहीतरी ठोस करायला हवे, असे म्हणत नूतन सरपंच बाळकृष्ण साठे यांनी, "यापुढे भोयरे गावात जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दोन हजार रुपये फिक्‍स डिपॉझिट म्हणून ठेवले जातील' अशी घोषणा केली. याशिवाय महिलांच्या सुविधेसाठी ग्रामपंचायत तर्फे सॅनिटरी नॅपकिन 
मशिन व इन्सोलेशन मशिन अंगणवाडी सेविकांकडे सुपूर्द करण्यात आली. 

कार्यक्रमास सरपंच बाळकृष्ण साठे, सदस्य ब्रह्मदेव फंड, माधुरी माळी, लक्ष्मी ताकमोगे, ग्रामसेवक सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी नेताजी कसबे, राजेंद्र पवार, शिक्षक, अंगणवाडी 
सेविका, ग्रामस्थ व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल