
Solapur Flood
Sakal
उ. सोलापूर : सीना नदीच्या प्रकोपामुळे कित्येक कुटुंबे उघड्यावर आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी येथील रूपनवर कुटुंब. तिघा भावांच्या एकत्रित कुटुंबात १७ व्यक्ती. पुराच्या पाण्याने या कुटुंबाचे सर्वस्व वाहून नेले. घरात वर्षभर पुरेल इतकी ज्वारी, गहू साठवले होते. त्याचबरोबर जनावरांसाठी दहा क्विंटल मका. पाण्याने हे धान्य भिजवले तर चारा वाहून नेला. निसर्गाच्या या कोपामुळे या कुटुंबापुढे आता १७ माणसांसोबत १६ जनावरांचा कसा सांभाळ करणार, असा प्रश्न उभा राहिला आहे.