
पंढरपूर: भीमा आणि नीरा खोऱ्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या जवळपास शंभर कुटुंबाचे सुरक्षितस्थळी सस्थलांत करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २०) सकाळी चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला तर चंद्रभागेच्या पात्रातील भक्त पुंडिलकासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. रात्री ९ः३० वाजता चंद्रभागानदी सुमारे ७७ हजार ७०० क्युसेकने प्रवाहित झाली होती.