पंढरपुरात पूरस्थिती

चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ; जुन्या दगडी पुलावर पाणी
Flood situation in Pandharpur Increase water level in chandrabhaga river
Flood situation in Pandharpur Increase water level in chandrabhaga river
Updated on

पंढरपूर - उजनी धरणातून भीमा नदीत ४० हजार तर वीर धरणातून नीरा नदीत ३३ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील भीमा नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. आज दुपारी वाळवंटातील श्री पुंडलिक मंदिरासह लगतच्या मंदिरांना पाण्याने वेढले आणि सायंकाळी जुना दगडी पुलावर पाणी आले. नदीची पातळी वाढत असल्याने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उजनी धरणाच्या वरील अनेक धरणांच्या क्षेत्रात आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनी आणि वीर धरणातील पाणी पातळीत गेल्या चार दिवसात झपाट्याने वाढ झाली. आज शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उजनी धरणातील पाणी साठा १०२.६७ टक्के इतका होता. उजनी धरणातून ४० हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते तर वीर धरणातून नीरा नदीत ३३ हजार ६५९ क्युसेक पाणी सोडले जात होते. दरम्यान या दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी कालपासून वाढू लागली. आज सकाळी चंद्रभागेच्या वाळवंटातील श्री पुंडलिक मंदिरासह लगतच्या मंदिरांना पाण्याने वेढले. दुपारी तीन वाजता पंढरपूर येथे नदीचा विसर्ग २३ हजार ३७८ क्युसेक होता. पंढरपूर येथील विसर्ग २५ हजार २८५ क्युसेक इतका झाल्यावर जुन्या दगडीपुलावर पाणी येते. सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या दगडी पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

भीमा नदीची पाण्याची पातळी वाढू लागली असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बाबत दुरदृश्याव्दारे बैठक घेतली. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, भीमा पाटबंधारे विभागाचे एस. एन. चौगुले आदी उपस्थित होते.

बाधितांची सुरक्षित व्यवस्था करा

पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना संभाव्य पुरामुळे कोणताही धोका पोहोचणार नाही तसेच जीवीत व वित्तहानी होणार नाही, यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रांताधिकारी श्री. गुरव यांनी दिल्या आहेत. पुरामुळे नदीकाठच्या गावातील ज्या लोकांची घरे बाधित होण्याची शक्यता आहे, अशा कुटुंबाचे तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, संबंधित गावातील शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, धर्मशाळा आदी सुरक्षित ठिकाणी थांबण्याची व्यवस्था करण्यात यावी. नदीकाठच्या लोकांनी जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलवावी. जेणेकरुन कोणतीही जिवित अथवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com