
Begumpur Flood
Sakal
अश्पाक बागवान
बेगमपूर : सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोली तिर्हे दरम्यान सीना नदीला आलेल्या महापुरामुळे जुना पूल पुर्णतः पाण्याखाली गेला तर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील नवीन पुलावरील वाहतूक व्यवस्था परिस्थितीचा अंदाज पाहून तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे.पुराच्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्यास वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अमित पांडे यांनी दिली सीना नदीवर सर्वात मोठा पूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभा करून देखील दमदार पावसामुळे त्याही पुलावरील वाहतूक बंद ठेवावी लागली.