

Heavy Flooding Hits Pandharpur, Yet Pilgrims Refuse to Miss the Holy Wari
sakal
-भारत नागणे
पंढरपूर : आषाढी पालखी सोहळ्यासाठी मंगळवारी (ता. ७) संत तुकाराम महाराज, तर बुधवारी (ता. ८) संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहू व आळंदीकडे निघाले आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला असून, प्रशासनाने वारकऱ्यांना आळंदीकडे येऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे हजारो भाविक पंढरपुरातच अडकून पडले आहेत. तरीही, ‘कितीही पाऊस पडला किंवा महापूर आला तरी आळंदीची वारी चुकवणार नाही, ’ असा निर्धार वारकऱ्यांनी व्यक्त केला आहे.