mohol heavy rain
sakal
मोहोळ - मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा, गावातील व शेतातील घरांचे व जमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्वामुळे शेतकरी पुन्हा दहा वर्षे मागे गेला आहे. जगण्याचा संघर्ष अत्यंत कठीण झाला असून, शेतकऱ्याला प्रशासनाने जरी मदत केली तरीही तो सावरायला किमान 10 वर्षाचा कालावधी जाणार आहे.