Hotgi police nab accused involved in assault and robbery near Sai Baba temple; loot and two-wheeler recovered during investigation.Sakal
सोलापूर
Solapur Crime: 'पादचाऱ्यास मारहाण करून लुटणारे जेरबंद'; होटगी साईबाबा मंदिरामागील चोरीची उकल, मुद्देमालासह दुचाकी हस्तगत
Hotgi Temple Theft Solved : स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुने यांच्या नेतृत्वातील पथकास गुन्ह्याच्या तपासासाठी घटनास्थळी पाठविले. त्यानंतर पथकाने संशयितांचा शोध सुरू केला.
सोलापूर: होटगीकडे पायी निघालेल्या हेमाराम केहराराम जाट (वय १८, रा. सायंटा, राज्यस्थान) यास लिफ्ट देण्याचा बहाणा करून ४ जुलै २०२५ रोजी होटगीतील साईबाबा मंदिरामागे तलावाजवळील शेतामध्ये नेऊन हेमाराम यास शिवीगाळ करून बेल्ट व काठीने मारहाण केली. त्यानंतर गळ्यातील सोन्याचे पदक, स्मार्ट वॉच, मोबाईल, रोकड असा एकूण २९ हजार ६०० रुपयांचा ऐवज व मोबाईलमधील ‘फोन पे’वरून सात हजार ९०० रुपये जबरीने काढून घेतले. यासंदर्भात हेमारामने वळसंग पोलिसांत फिर्याद दिली. गुन्ह्यातील तिघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.