
भारत शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने 'डिस्ट्रिक्ट ऑफ एक्स्पोर्ट हब' हा उपक्रम सुरू केला आहे.
सोलापूर : एक ट्रिलियनसह पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे अत्यंत ठाम लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातून विशेष उत्पादने आणि सेवा ओळखण्याची आणि वाढवण्याची गरज अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक उन्नतीसाठी हे महत्त्वाचे मापदंड समजून भारत शासनाच्या (Government of India) वाणिज्य मंत्रालयाने (Ministry of Commerce) 'डिस्ट्रिक्ट ऑफ एक्स्पोर्ट हब' (District of Export Hub) हा उपक्रम सुरू केला आहे. उद्योजकता विकसित करणे आणि त्यांच्यात वाढ करणे तसेच भारतातील प्रत्येक जिल्हा आणि या जिल्ह्यांमधून प्रमुख उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे, हे या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे, वाणिज्य मंत्रालयाने ही जबाबदारी फेडरेशन ऑफ इंडिया एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनला दिली आहे. त्यांच्या एक वर्षाच्या सर्व्हेमधून सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम उत्पादने म्हणून टेरी टॉवेल, रेडिमेड गारमेंट व डाळिंब ही उत्पादने पहिला टप्प्यात फायनल केली आहेत.
फेडरेशन ऑफ इंडिया एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (पश्चिम क्षेत्र) "व्हर्च्युअल कपॅसिटी बिल्डिंग' आयोजित करणार आहे. सोलापूर चादर, टेरी टॉवेलवर, रेडिमेड गारमेंट उद्योग व डाळिंब उत्पादकांवर विशेष लक्ष केंद्रित करून "डिस्ट्रिक्ट एक्स्पोर्ट हब' या उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. 20) सोलापूर येथे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. निर्यातदार, तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने परदेशी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आणि संधी शोधण्यासाठी व त्यांच्यात क्षमता निर्माण करण्यासाठी विविध विषयांतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
असे असणार "डिस्ट्रिक्ट ऑफ एक्स्पोर्ट हब'
सोलापुरातील उद्योगांचे कार्यक्षेत्र
सोलापूर जिल्ह्यातील गारमेंट, टेरी टॉवेल आणि डाळिंब निर्यात करण्याची संधी
भारतातून निर्यात वाढवण्यात FIEO ची भूमिका
यशस्वी निर्यात व्यवसाय सुरू करणे आणि व्यवस्थापित करणे
हा क्षमता निर्माण कार्यक्रम अतिरिक्त डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड (डीजीएफटी) पुणे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित केला जात आहे. सोलापूर जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर, आयसीएआर- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (एसजीएमए), सोलापूर सोशल फाउंडेशन आणि सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.
बुधवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 ते दुपारी चारपर्यंत ऑनलाइन क्षमता निर्माण कार्यक्रमात सामील होण्यासाठी झूम लिंक खालीलप्रमाणे आहे.
https://bit.ly/SOLAPUR आयडी : 812 2950 4388, पासवर्ड कोड : 904690
अधिक माहितीसाठी संपर्क : अंकित देवळेकर (8976196995) किंवा अक्षय शहा (9370774881)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.