
सोलापूर : सोलापूर- बार्शी मार्गावरील नान्नज येथील माळढोक अभयारण्यातील नागनाथ मंदिरात दरवर्षी नागपंचमीला जिवंत नागाची पूजा केली जाते. गतवर्षी नागपूजनाचा व्हिडिओ व्हायरल झाला. याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाने पुजाऱ्यास अशी पूजा न करण्याबाबत ताकीद दिली होती. तरीही यंदा वनविभागाला ठेंगा दाखवत जिवंत नागाची पूजा झाली.