

Forest officials displaying seized blackbuck meat and hunting equipment during action in Sangola taluka.
Sakal
सांगोला : वन्यप्राण्यांची शिकार करण्यास बंदी असताना सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या पथकाने आलेगाव (ता. सांगोला) येथे धडक कारवाई करत एका व्यक्तीच्या घरातून काळवीटाचे सुमारे ६.८८० किलो मांस व शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई शुक्रवार (ता. १२) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.