
सोलापूर: कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या तुलनेत स्मार्ट सिटी असूनही सोलापूर जिल्हा हा क्रीडा सुविधा अन् राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार करण्यामध्ये बॅकफुटला आहे. यासाठी जुन्या क्रीडापटूंनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. सोलापूर जिल्ह्यात क्रिकेटसह कबड्डी अन् कुस्तीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनही सुविधांअभावी सरावासाठी त्यांना इतर जिल्ह्याची निवड करावी लागत आहे.