Solapur Crime : 'माजी नगरसेवक पुत्रावर हल्ला; २८ जणांवर गुन्हा', जखमी झाल्याने डोक्यातून रक्तस्त्राव
Former Corporator’s Son Attacked : रस्त्यावर लहान मुले खेळत असतात म्हणून बिपिन याने त्यांना सावकाश जाण्यास सांगितले. त्यावरून त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. या वादातून त्यांनी फोन करून इतरांना बोलावले. २३ ते २८ जणांनी बिपिन यांची गच्ची पकडून जीवे मारण्याची धमकी दिली.
Tension in Area After Attack on Ex-Corporator's Son; 28 BookedSakal
सोलापूर : घोंगडे वस्तीत रविवारी (ता. २२) रात्री माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी २३ ते २८ जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.