पवारांचे हात धरून राजकारणात आलात, मग मोदीजी, शेतकरी कायदा करताना त्यांचा सल्ला का घेतला नाही? आडम मास्तरांचा संताप

Kisan Morcha
Kisan Morcha

सोलापूर : मी मोदी सरकारला आव्हान देत आहे, की हा शेतकरी विरोधी कायदा संपला पाहिजे. मोदीजी, आपण बारामतीला शरद पवार यांचे हात धरून राजकारणात आलात, आता शेतकरी बिल आणताना शरद पवारांचा सल्ला घेण्याची बुद्धी का झाली नाही? काळा पैसा आणणार म्हणाले, आणले नाही. जीएसटी कायदा, एनआरसी आणलं आणि आता ज्या मुंबईतील कामगारांनी रक्त सांडून ब्रिटिशांचा कायदा मोडून काढला. तुम्ही कोणाचे राज्यकर्ते आहात? मोदी व अमित शहा यांच्या जोडील अदानी व अंबानी हे राज्य करत आहेत. महात्मा गांधींनी बहिष्काराचं शस्त्र उचललं होतं. म्हणून मी सांगतो, कामगारांनो, या उद्योगपतींची उत्पादने खरेदी करू नका. त्यांच्यावर बहिष्कार घाला. 

शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आज (सोमवारी) मुंबईतील आझाद मैदानावर विराट किसान मोर्चा काढण्यात आला. या वेळी हजारो शेतकरी व कामगारांचा या विराट मोर्चात सहभाग होता. या वेळी सोलापूरचे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मोदी सरकारवर सडेतोड टीका केली. या वेळी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

श्री. आडम पुढे म्हणाले, मोदींना वाटतंय, माझ्यासोबत मिलिटरी आहे. मात्र या मिलिटरीमधील सैनिक शेतकरी कुटुंबातील आहेत. गोरे जाऊन काळे येतील पण परिस्थितीत बदल होणार नाही. संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं या 73 वर्षांमध्ये 45 लाख कोटी रुपये नुकसान झालं. चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जेव्हा छत्रपतीचे वारसदार तलवार उपसतील तेव्हा मोदी सरकार भुईसपाट होईल. 26 जानेवारीला या राष्ट्रगीताची शपथ घेऊन मोठ्या ट्रॅक्‍टर मोर्चात एक कोटी शेतकरी व कामगार सहभागी होणार आहेत. मोदी सरकारकडे किती दम आहे, तो मोर्चा अडवून दाखवून द्यावा. आम्ही किसान आणि कामगारांना न्याय मिळवून देणारच.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com