
पंढरपूर : उद्धव ठाकरे यांना कुणीही धक्का देत नाही. उद्धव ठाकरे यांची वर्तणूकच त्यांना धक्का देत आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःबाबत आत्मचिंतन करावे. आणि खऱ्या शिवसेनेसोबत यावे, असा सल्ला शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी दिला आहे. तर गंगेत स्नान करू नये, गंगा मैली होईल असा टोला संजय राऊत यांना लगावला.