Solapur Election Case : माजी आमदार संजय शिंदे निर्दोष; निवडणुकीत पैसे वाटप प्रकरण; अकरा वर्षांनंतर लागला निकाल
Political Leader Acquitted : खटल्याची सुनावणी दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. पी. कुलकर्णी यांच्यासमोर झाली. या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे ॲड. सचिन लुणावत यांनी तर संशयितांतर्फे ॲड. प्रमोद जाधव व ॲड. सुनील रोकडे यांनी कामकाज पाहिले.
Former MLA Sanjay Shinde walks free after court acquits him in the 11-year-old election cash distribution case.esakal
करमाळा: करमाळा- माढा विधानसभा निवडणूक २०१४ च्या प्रचारा दरम्यान पैसे वाटप केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह सात संशयितांची करमाळा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अकरा वर्षांनंतर या खटल्याचा निकाल देण्यात आला.