esakal | पुणे-सोलापूर-पुणेसाठी धावणार इलेक्‍ट्रिक बस ! सोलापुरात त्यासाठी असणार चार चार्जिंग पॉइंट

बोलून बातमी शोधा

Electric_Bus

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात लवकरच 10 इलेक्‍ट्रिक बस दाखल होणार आहेत. यासाठी डिपार्टमेंटल वर्कशॉपमध्ये चार चार्जिंग पॉइंट होणार असल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली. 

पुणे-सोलापूर-पुणेसाठी धावणार इलेक्‍ट्रिक बस ! सोलापुरात त्यासाठी असणार चार चार्जिंग पॉइंट
sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात लवकरच 10 इलेक्‍ट्रिक बस दाखल होणार आहेत. यासाठी डिपार्टमेंटल वर्कशॉपमध्ये चार चार्जिंग पॉइंट होणार असल्याची माहिती एसटी महामंडळ प्रशासनाने दिली. 

दिवसेंदिवस डिझेलची दरवाढ होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने राज्यात 100 इलेक्‍ट्रिक बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर विभागासाठी 10 इलेक्‍ट्रिक बस येणार आहेत. सोलापूर- पुणेसाठी पाच गाड्या आणि पुणे- सोलापूरसाठी पाच अशा एकूण दहा गाड्यांचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. तर सोलापूर - विजयपूर - सोलापूर या मार्गासाठी देखील गाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. सोलापूर डिपार्टमेंटल वर्कशॉपमधील वॉशिंग रॅम या ठिकाणी चार चार्जिंग पॉइंट असणार आहेत. या चार्जिंग पॉइंटची 11 केव्ही पॉवर सप्लायची क्षमता असणार आहे. 150 किलो वॉट आणि 90 किलो वॉट असे प्रत्येकी दोन चार्जिंग पॉइंट असणार आहेत. 90 किलो वॉटने एक बस चार्जिंग होण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागणार आहे तर 150 किलो वॉटने एक बस चार्जिंग होण्यासाठी एक तासाचा कालावधी लागणार आहे. 

असे काम करणार चार्जर 
सुरवातीस वॉशिंग रॅम या ठिकाणी चार्जर पॉइंटजवळ इलेक्‍ट्रिक बस येईल. येथील चार्जर बॅटरीस जोडले जाईल. 150 किलो वॉटच्या चार्जरमधून एका तासात बस चार्ज होईल. तर 90 किलो वॉटच्या चार्जिंगने साडेतीन तासांत बॅटरी चार्ज होईल. 

ठळक बाबी... 

  • इलेक्‍ट्रिक बसची 300 किलो वॉटची बॅटरी असणार 
  • 150 किलो वॉटचे दोन असणार चार्जिंग पॉइंट 
  • 90 किलो वॉटचे असणार दोन पॉइंट 
  • 300 किलोमीटर धावू शकणार इलेक्‍ट्रिक बस 
  • 10 ते 12 प्रस्तावित आहेत चार्जिंग पॉइंट 

राज्य परिवहन महामंडळाने वाढत्या इंधनाचा खर्च लक्षात घेता, शंभर इलेक्‍ट्रिक बस राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्‍वभूमीवर सोलापूर विभागात देखील 10 इलेक्‍ट्रिक बस येणार आहेत. अत्याधुनिक पद्धतीचे चार चार्जिंग पॉइंटचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 
- रघुनाथ कांबळे, 
सरव्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई 

संपादन : श्रीनिवास दुध्याल