भीमा नदीत वडिलांच्या डोळ्यांसमोर बुडाली स्वत:ची व बहिणीची मुले !

लवंगी येथे भीमा नदीत चार मुले वाहून गेली
बुडून चार मुलांचा मृत्यू
बुडून चार मुलांचा मृत्यू Media Gallery
Updated on
Summary

वाहून गेलेल्या चारजणांमध्ये एक नऊवर्षीय मुलगा तर 13 वर्षीय दोन मुली आणि 11 वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती मंद्रूप पोलिसांनी दिली.

सोलापूर : भीमा नदीत (Bhima River) पात्रात लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तानवडे व दुपारशेट्टी परिवारातील चारजण वाहून गेल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी साडेतीन वाजता घडल्याची माहिती मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली. (Four children were swept away in the river Bhima at Lavangi)

बुडून चार मुलांचा मृत्यू
भीमा नदीत बुडालेल्या मामी-भाच्याचे मृतदेह पाहून फोडला कुटुंबीयांनी हंबरडा

नदीत पोहायला गेलेल्या वडिलाच्या मागे- मागे त्यांच्या दोन मुली आणि गावातच राहणाऱ्या त्यांच्या बहिणीचा नऊ वर्षांचा मुलगा व 11 वर्षांची मुलगी हे दोघेही नदीच्या दिशेने आले. तानवडे यांच्या 13 वर्षीय मुलीला व त्यांच्या बहिणीच्या 13 वर्षीय मुलीला पोहायला येत असल्याने त्या दोघीही नदीत उतरल्या. त्यानंतर नदी काठावरील तानवडे यांची नऊ वर्षीय मुलगी आणि बहिणीचा 11 वर्षांचा मुलगाही पाण्यात उतरला. परंतु, प्रवाह वाढल्याने चारही मुले वाहून जाताना वडील शिवाजी तानवडे यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी सुरवातीला त्यांच्या जवळ असलेल्या दोन मुलांना धरले आणि नदी काठावर आणून सोडले. नदी काठावर आल्यानंतर पाणी थोडे असल्याने ते दोघेही सुखरूप जातील असा त्यांना विश्‍वास होता. त्यानंतर ते दुसऱ्या दोघांना आणायला गेले. मात्र, तोवर प्रवाह वाढल्याने ते वाहून गेले. दरम्यान, काठापर्यंत सोडलेली दोन्ही मुलेही वाहून गेली होती, अशी हृदयद्रावक हकीकत शिवाजी तानवडे यांनी मंद्रूप पोलिसांसमोर कथन केली.

बुडून चार मुलांचा मृत्यू
शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर ! ग्रामीणमध्ये टेस्टिंग कमी !

लवंगी गावातील शिवाजी तानवडे यांची दोन मुले व त्यांच्या बहिणीची दोन मुले भीमा नदीत वाहून गेली आहेत. मासेमारी करणाऱ्या तरुणांकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पावसामुळे अडथळा आला.

- नितीन थेटे, पोलिस निरीक्षक, मंद्रूप पोलिस ठाणे

मुलांचा रविवारी घेतला जाईल शोध

लवंगी येथील चार मुले भीमा नदीत वाहून गेल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मासेमारी करणाऱ्या भोई समाजातील मुलांना बोलावून शोध घेतला जात होता. परंतु, पाऊस सुरू असल्याने त्या मुलांचा शोध घेता आला नाही. त्यामुळे आता रविवारी (ता. 30) त्या मुलांचा शोध घेतला जाणार आहे. वाहून गेलेल्या चारजणांमध्ये एक नऊवर्षीय मुलगा तर 13 वर्षीय दोन मुली आणि 11 वर्षीय मुलीचा समावेश असल्याची माहिती मंद्रूप पोलिसांनी दिली. नदीच्या पात्राचा अंदाज येत नसल्याने पालकांनी मुलांना त्या ठिकाणी घेऊन जाऊ नये, खरबदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक थेटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com