पंढरपूर शहरात वाढले चार कोरोनाबाधित; शहर व तालुक्‍याची रुग्णसंख्या झाली 49 

Corona Update.
Corona Update.
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातील आणखी चार व्यक्तींचे काल रात्री उशिरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या आता 29 वर पोचली आहे. आणखी 192 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. 

पंढरपूर शहरातील रोहिदास चौक येथील दोन, मंदिर परिसरातील एक आणि झेंडे गल्ली भागातील एक अशा चार व्यक्तींचे रिपोर्ट काल रात्री पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता शहर व तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 49 झाली आहे. त्यापैकी 21 रुग्ण बरे झाले असून 23 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी याविषयी माहिती दिली. आतापर्यंत पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या 49 व्यक्तींमध्ये शहरातील 
29, ग्रामीण भागातील 13 आणि इतर जिल्हे व तालुक्‍यातून आलेल्या सात व्यक्तींचा समावेश आहे. 

उपचार सुरू असलेल्या 27 व्यक्तींमध्ये शहरातील 16, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील सहा आणि इतर तालुके व जिल्ह्यांमधील पाच व्यक्तींचा समावेश आहे. सध्या 172 लोकांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत शहर व तालुक्‍यातील 1023 व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 
831 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून अद्याप 192 अहवाल प्रलंबित आहेत. 

शहरातील रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तथापि नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com