Solapur News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी बार्शीच्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह चार जण निलंबित! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four people including female police officer of Barshi suspended abuse minor girl

Solapur News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी बार्शीच्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह चार जण निलंबित!

बार्शी : तालुक्यातील बारावीच्या अल्पवयीन परीक्षार्थी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असताना दोन पोलिस अधिकारी व दोन पोलिस हवालदारांनी कर्तव्यात कसूर केला तसेच तात्काळ दखल घेतली नाही

अन्यथा दुसरा गुन्हा घडला नसता असा ठपका ठेऊन सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे यांनी चौघांना सेवेतून बुधवारी(ता.८)रोजी निलंबित केल्याने बार्शी शहर व तालुक्यात पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे,बार्शी शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सारिका गटकूळ,बार्शी तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार राजेंद्र मंगरुळे,बार्शी शहर पोलिस ठाण्यातील हवालदार अरुण माळी अशी निलंबित करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

तालुक्यातील गावामधील बारावी परीक्षार्थी अल्पवयीन मुलगी घरी परत जात असताना तिच्यावर शहर पोलिस ठाणे हद्दीत अत्याचार झाला त्यावेळी तिने फिर्याद दाखल करुनही तपास अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन संशयितांना अटक केली नाही तसेच वैद्यकीय तपासणी केली नाही ताब्यात घेतले असते तर दुसरा गुन्हा टळला असता.

तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत गावातील घरामध्ये दोघांनी घुसून अल्पवयीन मुलीला सत्तूर,कोयत्याने वार झाले तरी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नाही,वैद्यकीय तपासणी केली नाही कर्त्यव्यामध्ये चौघांनी कसूर केल्याचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन नाही झाला साजरा ...

दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदारपासून मदतनीसांपर्यंत पोलिस ठाण्यात महिला राज कर्तव्यास ठेऊन आदर ठेवत सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सायंकाळी सत्कार कार्यक्रम असतो पण उपनिरीक्षक सारिका गटकूळ निलंबित झाल्याने सर्वत्र शांतता,शुकशुकाट होता.

दरम्यान ६ मार्च रोजी बार्शी शहर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षकपदी संतोष गिरीगोसावी रुजू झाले असून त्यांचेशी दैनिक 'सकाळ'प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी निलंबित केल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत असा दुजोरा दिला.

टॅग्स :Solapurcrimeabuse