Accident : भीषण अपघातात चौघे ऊसतोड मजूर ठार

रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
Four sugarcane workers were killed in a horrific accident
Four sugarcane workers were killed in a horrific accidentsakal

मंगळवेढा / ढालगाव - रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव फाटा येथे ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून भरधाव जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरमधील चार ऊसतोड मजूर जागीच ठार झाले. तर १० जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २) पहाटे चारच्या दरम्यान घडली आहे. मृतांत एक पुरुष, दोन महिला व एका बालकाचा समावेश आहे.

गुरुदत्त साखर कारखाना (शिरोळ, जि. कोल्हापूर) येथून ऊसतोड मजूर ट्रॅक्टर ट्रॉली (केए२८-३५६९) मधून चिक्कलगी व शिरनांदगी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या आपल्या गावांकडे निघाले होते. यादरम्यान रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आगळगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरचा बेल्ट तुटल्याने रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर उभा केला होता.

यादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एपी ३९- यूएम ५३८८) ट्रॅक्टरला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की ट्रॅक्टर- ट्रॉलीतील चार मजूर खाली पडून ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. या अपघातात दहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती समजताच कवठेमहांकाळचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पार्थिव कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दहा जखमींना कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विभागीय पोलिस अधिकारी सुनिल साळुंखे, तासगावचे थोरबोले, पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील व सरपंच थोरबोले हेही रुग्णालयात उपस्थित होत.

जखमींची नावे

महानंदा संगाप्पा केंगार (वय ३०), बसव्वा सुरेश बिरूनगी (वय ५०), श्रीदेवी आप्पा ऐवळे (वय ४०), लक्ष्मी परशुराम ऐवळे (वय २), जयश्री भीमा ऐवळे (वय २८, सर्व रा. चिक्कलगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर), दत्ता बबन खांडेकर (वय ३५), नकुसा परशुराम बेरावमे (वय २३), सपना परशुराम ऐवळे (वय २०), धानम्मा मालिक ऐवळे (वय ६०), श्रुती मल्लिकार्जून केंगार (वय १२, सर्व रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा) अशी जखमीची नावे आहेत.

संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त

आगळगाव फाट्यावर टॅक्ट्रर चालक व मजूर बेल्ट बसवित होते. मिरजेहून सांगोल्याकडे जात असलेल्या मालवाहतूक ट्रकने ट्रॅक्टरला जोरात धडक दिली. अपघात इतका भीषण होता की ट्रकखाली सापडलेल्यांचे तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे शंभर फुटांपर्यंत पुढे फरफटत गेला. अपघात झालेल्या ठिकाणी मजुरांचे संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त विस्कटून पडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com