esakal | उद्यापासून कुर्डुवाडीमार्गे कोल्हापूर-धनबाद एक्‍स्प्रेस विशेष साप्ताहिक गाडी ! पंढरपूर-मुंबई विशेष गाडी 13 मार्चपासून 

बोलून बातमी शोधा

Dhanbad Express

कुर्डुवाडी मार्गे कोल्हापूर-धनबाद एक्‍स्प्रेस ही साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवार (ता. 19) पासून सुरू होणार असून, पंढरपूर-मुंबई ही विशेष गाडी 12 मार्चपासून आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याची माहिती कुर्डुवाडी रेल्वे स्थानक प्रबंधक आर. डी. चौधरी यांनी दिली. 

उद्यापासून कुर्डुवाडीमार्गे कोल्हापूर-धनबाद एक्‍स्प्रेस विशेष साप्ताहिक गाडी ! पंढरपूर-मुंबई विशेष गाडी 13 मार्चपासून 
sakal_logo
By
विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : कुर्डुवाडी मार्गे कोल्हापूर-धनबाद एक्‍स्प्रेस ही साप्ताहिक विशेष गाडी शुक्रवार (ता. 19) पासून सुरू होणार असून, पंढरपूर-मुंबई ही विशेष गाडी 13 मार्चपासून आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याची माहिती कुर्डुवाडी रेल्वे स्थानक प्रबंधक आर. डी. चौधरी यांनी दिली. 

दर शुक्रवारी ही गाडी (क्रमांक 01045) कोल्हापूर येथून पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे. कुर्डुवाडी येथे सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी पोचेल. मिरज, कवठे-महांकाळ, ढालगाव, जत रोड, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी मार्गे बार्शी, उस्मानाबाद, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, आदिलाबाद, नागपूर, इटारसी, जबलपूर, वाराणसी, गया मार्गे धनबादला रविवारी सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी पोचेल. 

धनबाद - कोल्हापूर (क्रमांक 01046) ही दर सोमवारी धनबाद येथून सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी निघून कुर्डुवाडी येथे बुधवारी सकाळी 7 वाजून 25 मिनिटांनी पोचेल. कोल्हापूर येथे बुधवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोचेल. या गाडीला स्लीपर, वातानुकूलित, सर्वसाधारण असे 19 डबे असणार आहेत.

13 मार्चपासून आठवड्यातून तीन दिवस पंढरपूर - मुंबई (क्रमांक 01028) ही गाडी दर सोमवार, मंगळवार व शुक्रवारी धावणार आहे. पंढरपूरहून रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी ही गाडी निघणार असून कुर्डुवाडी येथे रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी व मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोचणार आहे. परतीची मुंबई - पंढरपूर (क्रमांक 01027) ही गाडी आठवड्यातून रविवार, सोमवार व शुक्रवारी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी मुंबईहून निघणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी कुर्डुवाडी येथे व पंढरपूर येथे सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी पोचणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल