सुखद बातमी ! व्हॉटस्‌अपद्वारे 18 वर्षांपूर्वीच्या मैत्रिणींनी फेडले माहेरचं देणं 

priyanka kevale
priyanka kevale
Updated on

सोलापूर : सोशल मिडियाचा वापर टाईमपास म्हणून वाढू लागला असतानाच, मोहोळ (जि. सोलापूर) येथील ग्रामसेविका प्रियंका केवळे यांनी 2002 मधील दहावीच्या मैत्रिणींचा माहेरचं देणं म्हणून ग्रूप तयार केला. त्याच्या माध्यमातून लॉकडाउन काळात निराधारांना मदतीचे आवाहन केले आणि 25 हजारांहून अधिक मदत गोळा झाली. त्यातून त्यांनी माहेरच्या (मोहोळ) गोरगरिब कुटुंबांना दहा दिवस पुरेल एवढी जीवनावश्‍यक वस्तूंची मदत केली. 


हाताला मिळेल ते काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या हाताला आता मागील 26 दिवसांपासून काम नाही. घरात शिल्लक असलेले काही दिवसांचे धान्यही संपले. आता उपाशी पोट भरायचे कसे, या चिंतेत असलेल्या माहेरच्या गोरगरिब कुटुंबांसाठी 18 वर्षांपूर्वी मोहोळमधील इंदिरा कन्या प्रशालेत दहावीत शिकणाऱ्या मैत्रिणींनी व्हॉटस्‌अप ग्रूप तयार केला. लॉकडाउनमध्ये आर्थिक विवंचनेत अडकलेल्यांना मदतीचा विचार पुढे आला आणि ग्रामसेविका प्रियंका केवळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहूतांश मैत्रिणींनी आर्थिक मदत दिली. मुलगी दोन घरची पणती या उक्‍तीप्रमाणे त्यांनी दिलेल्या मदतीतून दहा दिवस पुरेल इतक्‍या जीवनाश्‍यक वस्तू निराधारांना दिल्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून या मैत्रिणींना खूप आनंद झाला. 


निराधारांना या मैत्रिणींनी दिला मदतीचा हात 
कोरोनाच्या वैश्‍विक संकटात 18 वर्षांपूर्वी दहावीत शिकणाऱ्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणी ताज्या केल्या. आपण मोठ्या झाल्यावर सामाजिक परिस्थिती बदलण्याचा संकल्प त्यांनी त्यावेळी केला होता. कोणी पोलिस तर कोणी कृषी सहायक, ग्रामसेवक, डॉक्‍टर झाल्या. श्‍वेता कंदले, स्नेहल माने, उर्मिला वाघमारे, अमृता आराध्ये, जयश्री नरुटे, ललिता वाघमोडे, निता डोकडे, ज्योती देशमुख, सुकेशना गायकवाड, विजया जाधव, सविता ढोबळे, प्रियंका केवळे यांनी मोहोळ शहरातील निराधारांसाठी मदत दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Students to Receive ₹5100 Monthly Aid; Hostel Admission Issues Resolved
गुगल मॅप
बालसंगोपन योजनेसाठी निधी नाही
Textile Trade Route Turns Crime Scene as ₹3 Crore Robbery Rocks Tembhurni
Marathi News Esakal
www.esakal.com