
सलगर बुद्रुक : अनेक वर्षांपासून बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून ६ कोटी ५० लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सदर पूल निर्माण होण्यासाठी रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर तसेच या भागातील आसपासच्या गावातील नागरिकांनी गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून आपल्या मागणीचा रेटा लावून धरला होता.