

Tragic Twist: Family in Mourning as Student Misses Chance to See Exam Results
sakal
सोलापूर : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला असून मृतांवर अंत्यसंस्कार कोण करणार, याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी हा महिलेचा दीरच असल्याने, तसेच पती व दुसरा दीर यांचे यापूर्वीच निधन झालेले असल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. या पार्श्वभूमीवर महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.