
सोलापूर : सोलापूर-विजयपूर बायपासवरील जंगली हॉटेलसमोर एका कारमधून (एमएच ४७, एएन ८९१७) फौजदार चावडी पोलिसांनी आठ लाख ६४ हजार रुपयांचा ४८ किलो गांजा पकडला आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फौजदार चावडी पोलिसांनी ही कारवाई केली. पण, कागदपत्रे दाखविण्याचा बहाणा करून चालक पसार झाला आहे.