अर्ध्या एकरात फुललेले गणपती बाप्पाचे ग्रास पेंटिंग सोलापूर शहरात बनले कौतुकास्पद ! 

grass painting.jpg
grass painting.jpg
Updated on

सोलापूर ः ग्रास पेंटिंगच्या माध्यमातून सोलापूरचा तरुण चित्रकार प्रतिक तांदळे व त्याच्या मित्रांनी चक्क अर्धा एकर परिसरात गणपतीचे चित्र हिरवाईच्या माध्यमातून साकारले आहे. अगदी आगळावेगळा अनुभवासाठी या मुलांनी पडत्या पावसासोबत मांडलेला हिरवाईचा छंद अखेर तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी ठरला आहे. या ग्रासपेंटिंगने सोलापूर शहरवासियांना उत्सवातील इकोफ्रेंडली मुल्यांची जाण करुन देण्याचे काम केले आहे. 

बाळे परिसरात प्रतिक तांदळे हा कुचन चित्रकला महाविद्यालयात शिक्षण घेतो काहीतरी वेगळे करायचे म्हणून त्याने जपानच्या ग्रास पेंटिंगचा अभ्यास सुरू केला. त्याचे मित्र अभिजय गायकवाड, राघव शिंदे, बॉबी तोडकरी, वैभव कोळी, ओंकार राजुरे, बालाजी अंभुरे, अजय बामनकर या मित्रांना संकल्पना समजावून सांगितली. हे सर्व मित्र प्रतिकच्या प्रयोगात सहभागी झाले. 


प्रतिकने घरच्यांची अर्धा एकर शेतात प्रयोग करण्यासाठी परवानगी घेतली. या पेंटिंगसाठी शेतामध्ये आधी ग्राफनुसार तुकडे आखावी लागतात नंतर कागदावर मॅपिंग करावी लागते पेपर वर साठी पंधरा दिवस गेले नंतर प्रत्यक्ष शेतामध्ये आखणी केली. 

गहू आणि अळीव यांचा वापर करण्याचे ठरले पहिल्यांदा आखणी केल्यानंतर जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये अळीवाचे बियाला बुरशी चढली पावसासोबत आखणी वाहून गेली. प्रतिकची मित्र कंपनी या प्रकाराने चिंतेत सापडले. दुसऱ्यांदा पुन्हा आखणी करून गहू आणि अळीव पेरला मात्र पावसाने पुन्हा दगा दिला आता मात्र सर्वच मित्र हताश झाले. 
एकतर आखणीनुसार गणपतीचे चित्र कुठे दिसत नव्हते आणि जे पेरले ते उगवत नव्हते मात्र प्रतिक चित्रकलेचे विद्यार्थी असल्यामुळे त्याला खात्री होती. अखेर एक जुलैच्या सुमारास पुन्हा एकदा व्यवस्थित पेरणी केली गेली पावसानेही नंतर साथ दिली. एक महिन्याच्या अंतरानंतर उगवण झाली. गणपतीच्या आकारानुसार दिसू लागली. मात्र, जमिनीवरून प्रत्यक्ष पाहणाऱ्याला हा आकार दिसत नाही. त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची गरज लागते उगवण झाल्यानंतर गणपती दिसत नाही, असे वाटत होते. मग सर्व मित्र कंपनीने मिळून ड्रोन कॅमेरा शूटिंग व फोटोग्राफ काढले तेव्हा मात्र ग्रास पेंटिंगचे गणपतीबप्पा अवतरले आहेत, याची खात्री सर्वांना पटली. या प्रयोगासाठी त्यांनी 100 किलो अळीव व 80 किलो गहु वापरला. 
प्रतिक आणि त्यांच्या मित्रांचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता नंतर परिसरातील लोकही हा प्रयोग पाहण्यासाठी येऊ लागले. ग्रास पेंटिंगचा हा प्रयोग आता बाळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. एवढ्यावरच प्रतिक समाधानी नाही आता पुढे आणखी क्रिएटिव्ह प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com