सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धा

सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धा
सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धा
सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धाCanva
Summary

गणपतराव देशमुख सांगोल्यातील जनतेसाठी आमदार होतेच पण त्याचबरोबर ते दुष्काळी मंगळवेढ्यासाठी देखील आमदार होते.

मंगळवेढा (सोलापूर) : सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्‍यातीलही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. गणपतराव देशमुख सांगोल्यातील जनतेसाठी आमदार होतेच पण त्याचबरोबर ते दुष्काळी मंगळवेढ्यासाठी देखील आमदार होते; कारण मंगळवेढ्यातील पाणीप्रश्‍नासाठी त्यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठवला होता. (Ganpatrao Deshmukh along with Sangola tried for the water question of Mangalwedha-ssd73)

सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धा
राजकारणात समाजकारण केलेला नेता : प्रियांका गांधी

मंगळवेढा तालुक्‍यातील भीमा नदी व उजनी कालव्याच्या लाभक्षेत्राचा परिसर वगळता पूर्ण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी तालुक्‍याला कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळावे यासाठी आबांनी 13 दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना एकत्र करून पाणी परिषदेच्या माध्यमातून एक एक मोठा लढा उभा केला होता. त्यासाठी दिवंगत नागनाथ नायकवाडी यांच्याबरोबर त्यांनी अनेक शेतकरी आंदोलकांना एकत्र करण्याचे काम केले. उजनी कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यासाठी देखील त्यांनी मंगळवेढ्याच्या संघर्षात योगदान दिले. याशिवाय म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्‍याच्या दक्षिण भागातील गावांना मिळावे यासाठी त्यांनी आंदोलनाबरोबरच विधानसभेतही आवाज उठवला. त्यांच्या या तळमळीला तत्कालीन आमदार दिवंगत भारत भालके (Bharat Bhalke) यांनी देखील साथ दिल्यामुळे या दोघांच्या पाण्यासाठीच्या तळमळीमुळे तब्बल 21 वर्षांच्या लढ्यानंतर मंगळवेढ्याला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळाले. त्यामध्ये गणपतराव देशमुख यांचे योगदान सर्वात मोठे योगदान होते.

सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धा
आबांना मिळत होती सर्वाधिक पेन्शन! छदामही खर्चला नाही स्वत:साठी

त्यानंतर बहुचर्चित पस्तीस गावांच्या पाण्यासाठी सरकारने प्रस्तावित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी देखील त्यांनी स्व. भारत भालके यांनी केलेल्या प्रयत्नांचे हुन्नूर येथे झालेल्या कार्यक्रमात कौतुक करत "कित्येक पिढ्या गेल्या तरी देखील पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षामध्ये आपणाला दुष्काळी भागातील जनतेने साथ दिल्यामुळे आपण हा पाण्यासाठी लढा समर्थपणे पेलू शकलो' असा दावा त्यांनी केला. सांगोल्याबरोबरच मंगळवेढ्याच्या पाण्यासाठी झटणारा योद्धा दोन्ही तालुक्‍यांतील जनतेने गमावला आहे.

पस्तीस गावांचा पाण्याचा लढा उभा करण्यापूर्वी स्व. नागनाथ नायकवाडी व गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने आम्ही अनेक पाणी परिषदेला हजेरी लावली. त्यांच्यामुळेच मंगळवेढ्यातील 35 गावांचा पाण्याचा लढा उभारण्यासाठी प्रेरणा मिळाली. स्व. भालके व आबांच्या जाण्याने पाण्याच्या संघर्षशील चळवळीतील दोन मोहरे गळाले. त्यांच्या संघर्षाचा आदर्श ठेवून यापुढील काळात पाण्यासाठी लढा उभा करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

- पांडुरंग चौगुले, आंदोलक, पस्तीस गाव पाणी संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com