

Solapur District Bank Election Sees Ganpatrao Deshmukh Grandsons Contesting on Different Panels and Drawing Political Attention
esakal
-दत्तात्रय खंडागळे
सांगाेला : राजकारणात विचारधारा, पक्षनिष्ठा आणि राजकीय वारसा यांना विशेष महत्त्व असते. मात्र सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मात्र राजकीय समीकरणे वेगळीच दिसतात. याचाच प्रत्यय सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत येत असून, अकरा वेळा आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे दोन नातू दोन वेगवेगळ्या पॅनलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात या लढतीची विशेष चर्चा रंगली आहे.