esakal | घरगुती गॅस हजारीकडे : सर्वसामान्य जनता हतबल
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

घरगुती गॅस हजारीकडे : सर्वसामान्य जनता हतबल

sakal_logo
By
राजाराम माने

केतूर : गेल्या दीड-दोन वर्षांपासून सर्वसामान्य जनता कोरोना (corona) महामारीच्या संकटाचा सामना करीत असतानाच इंधन दरवाढीमुळे या महागाईत घालण्याची काम केल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे कोरोना (Corona) महामारी मुळे अगोदरच उद्योग-व्यवसाय (Business) नोकऱ्या ठप्प झाले आहेत त्यातच इंधन दरवाढ बरोबरच गॅस (Gas) दरवाढीने (Prize Increase) सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे त्यातच घरगुती गॅसने (Gas) तर हजारीकडे आगेकूच सुरू केली आहे.महिनाभरात 190 रुपयांची दरवाढ गॅसने केली आहे.

इंधनाच्या दर व इंधनाची दरवाढ ही आणि व इतर दरवाढीवर परिणामकारक ठरते त्यामुळे भाजप भाजीपाल्यापासून ते गोड येथील साखर डाळी आदींची दर वाढत आहेत त्यातच घरगुती गॅस घेणे हे तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चे होत आहे मोदी सरकारने उज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस दिला परंतु ही योजना एक-दोन वर्षातच गुंडाळावी लागली त्यातच गॅस साठी मिळणारी सबसिडी ही बंद करण्यात आली आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरात तर रोजच वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पार कोलमडून गेले आहे सरकारने सर्वसामान्यांना दिलासा म्हणून गॅस डिझेल पेट्रोल यांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील आशा कराव्यात व त्यात वारंवार वाढ करू नये अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करू : उद्धव ठाकरे

" कोरोना महामारीपासून सगळ्याच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत व होत आहेत गोडे तेल, साखर, डाळी महाग झाले आहेत यातच घरगुती वापराच्या गॅसच्या दरातही वरचेवर वाढ होत आहे त्यामुळे घरखर्च भागवताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे बचतीचा प्रश्नच येत नाही.

- शुभांगी विघ्ने, गृहिणी, केतुर

"गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमती वरचेवर वाढत आहेत यामुळे गॅस बंद ठेवावा लागत आहे.स्वयंपाकासाठी रॉकेल मिळत नाही सरपणाचे अवघड आहे आता चूल कशी पेटवायची ? हा प्रश्न आहे.

- शिवगंगा खैरे,गृहिणी, केतुर

हेही वाचा: केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात शिवसेना रस्त्यावर, मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने

" एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्नात घट होत झाली आहे तर दुसरीकडे मात्र महागाई वरचेवर वाढत आहे त्यामुळे जगणेच अवघड झाले आहे.

-सारिका माने, गृहिणी, केतूर

"शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोणत्याही मालाला योग्य दर मिळत नाही तर इतर वस्तूंचे मात्र दर वाढतात त्यामुळे शेती व्यवसाय मात्र पूर्णपणे अडचणीत आला आहे.

- शहाजी पांढरे, शेतकरी,केतूर

loading image
go to top