मोडनिंब: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा तोडण्याचे काम गोरक्षक करीत आहेत. गोशाळा हे जनावरांचे तुरुंग झाले आहेत. शेतकऱ्यांच्या जगण्याच्या आड येणारा गोरक्षणाचा कायदा करण्याची काहीही गरज नव्हती. धर्माचा बुरखा पांघरून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे. याचा प्रतिकार करायलाच हवा, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.