esakal | सोलापूरकरांनो! तुमच्या प्रभागात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या दोन्ही लाटेतील अपडेट
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूरकरांनो! तुमच्या प्रभागात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या दोन्ही लाटेतील अपडेट

कोरोनाची दुसरी लाट आता शांत होऊ लागली असून, शहरातील 26 पैकी नऊ प्रभाग कोरोनामुक्‍त झाले आहेत.

तुमच्या प्रभागात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या अपडेट

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आता शांत होऊ लागली असून, शहरातील 26 पैकी नऊ प्रभाग कोरोनामुक्‍त झाले आहेत. दुसरीकडे, दहा प्रभागांमधील प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे. दिलासादायक बाब म्हणजे अक्‍कलकोट (Akkalkot), मंगळवेढा (Mangalwedha), मोहोळ (Mohol), उत्तर सोलापूर (North Solapur) व दक्षिण सोलापूर (South Solapur) तालुक्‍यातील कोरोनाचा प्रादुर्भावही आटोक्‍यात आला आहे.

हेही वाचा: कासेगावातील राष्ट्रवादी मेळाव्यात कोरोना नियमांचा फज्जा!

कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहरातील 29 हजार 231 तर ग्रामीणमधील एक लाख 68 हजार 175 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. त्यामध्ये शहरातील 27 हजार 765 तर ग्रामीणमधील एक लाख 62 हजार 512 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. सध्या शहरातील 23 तर ग्रामीणमधील दोन हजार 206 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, ग्रामीणमधील तीन हजार 457 तर शहरातील एक हजार 443 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून नागरिकांनी नियमांचे पालन तंतोतंत केल्यास तिसऱ्या लाटेचा धोका राहणार नाही, असा विश्‍वास आरोग्य विभागाला आहे. शहरातील प्रभाग एक, दोन, चार, 11, 12, 13, 18, 19 आणि 25 मध्ये सध्या एकही रुग्ण नाही. दुसरीकडे प्रभाग तीन, पाच, सहा, नऊ, 14, 15, 17, 20, 22 आणि 26 मधील प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहे. प्रभाग आठ, 10, 16, 21 मध्ये प्रत्येकी दोन, प्रभाग सातमध्ये चार, 23 मध्ये तीन रुग्ण आहेत. तर सर्वाधिक आठ रुग्ण प्रभाग 24 मध्ये आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन केल्याने कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आरोग्य, शिक्षण, पोलिसांच्या मदतीने कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील सहा लाख 40 हजार 503 पैकी आतापर्यंत कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस तीन लाख 30 हजार 157 जणांनी तर दुसरा डोस एक लाख 45 हजार 255 जणांनी घेतला आहे.

हेही वाचा: भोंदू मनोहरमामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात कधी मिळणार?

ग्रामीणमध्येही कोरोनाचा कमी होतोय प्रादुर्भाव

रविवारी अक्‍कलकोट तालुक्‍यात दोन, मंगळवेढ्यात पाच, मोहोळ तालुक्‍यात सहा, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात एक, बार्शीत 22, करमाळ्यात 29, माढ्यात 34, पंढरपूर तालुक्‍यात 28, सांगोल्यात 19 आणि माळशिरस तालुक्‍यात 25 रुग्ण आढळले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्‍यात मात्र, एकही रुग्ण वाढलेला नाही. रविवारी म्युकरमायकोसिसचे नव्याने तीन रुग्ण वाढले आहेत.

प्रभागनिहाय कोरोनाची स्थिती

 • प्रभाग - एकूण रुग्ण - मृत्यू - ऍक्‍टिव्ह रुग्ण

 • 1 - 736 -45 - 00

 • 2 - 766 - 43 - 00

 • 3 - 997 - 70 - 01

 • 4 - 625 - 38 - 00

 • 5 - 1819 - 58 - 01

 • 6 - 1342 - 76 - 01

 • 7 - 1766 - 88 - 04

 • 8 - 1157 - 65 - 02

 • 9 - 738 - 46 - 01

 • 10 - 606 - 34 - 02

 • 11 - 438 - 25 - 00

 • 12 - 479 - 27 - 00

 • 13 - 720 - 35 - 00

 • 14 - 911 - 50 - 01

 • 15 - 1512 - 63 - 01

 • 16 - 1386 - 58 - 02

 • 17 - 445 - 25 - 01

 • 18 - 622 - 25 - 00

 • 19 - 285 - 17 - 00

 • 20 - 630 - 45 - 01

 • 21 - 1731 - 71 - 02

 • 22 - 662 - 43 - 01

 • 23 - 2328 - 129 - 03

 • 24 - 3538 - 144 - 08

 • 25 - 1015 - 37 - 00

 • 26 - 1987 - 86 - 01

loading image
go to top