हर घर रोजगाराची आवश्यकता आ.प्रणिती शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Praniti Shinde

हर घर रोजगाराची आवश्यकता आ.प्रणिती शिंदे

मंगळवेढा ता.14 सकाळ वृत्तसेवा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होताना अजूनही तरुणांना रोजगार नाहीये,बॅक खात्यावर 15 लाख रुपये जमा नाहीत त्यामुळे हर घर तिरंगा अभियाना पेक्षा हर घर रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे.असे मत काॅग्रेस (आय)च्या कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा येथे बोलताना व्यक्त केले.

आजादी गौरव पदयात्रेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या दामाजी चौक चोखामेळा चौक ते ते प्रांत कार्यालय दरम्यान ही पदयात्रा काढण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेचा समारोप करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, सुरेश कोळेकर, अजित जगताप,राजश्री टाकणे,

अर्जुनराव पाटील,मारूती वाकडे, नाथा ऐवळे राजाभाऊ चेळेकर,दिलीप जाधव, मनोज माळी,मुबारक शेख,शहाजन पटेल,नशीम अंकुजी,अशोक चेळेकर,राहूल टाकणे,जयश्री कवचाळे,आदी उपस्थित होते.त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना आ.शिंदे म्हणाल्या की,सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे गृहिणींना स्वयंपाकासाठी रॉकेल मिळत नाही. गॅसचे दर वाढलेले आहेत.तरुणांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आग्नीवीर सारख्या हुकूमशाही योजना आणल्याने तरुणांच्या आत्महत्या काही केल्या थांबेना. सरकार अजूनही जागे होत नाही.जे बलिदान सैनिक व महापुरूषांनी देशासाठी दिले.ते विसरून चालणार नाही.देशाला एकजूट ठेवण्याची जबाबदारी काॅग्रेस पदाधिकाऱ्याची आहे.

कुणी सत्ताधाऱ्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही.ते देश फोडायचे काम करत आहे.देशाची एकात्मता आणि बहुमता एक ठेवू शकतो ही आपली जबाबदारी आहे.लोकशाही एकीकडे हत्या होत असताना काॅग्रेस पदाधिकाऱ्याने लोकशाहीला ठेवले पाहिजे लोकांची शाळा आहे हुकूमशाही नाही आणि ते टिकवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे पाहिजे.संविधान वाचण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे या संविधानाने आज हा देशाला तिरंगा दिला आहे संविधानाच्या निर्मितीमध्ये काँग्रेसच्या दिग्गजाचे योगदान महत्त्वाचे ठरले. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर महिना अखेरीस येत आहेत त्यांची दररोज 25 कि.मी यात्रा महाराष्ट्रात 16 दिवस चालणार आहे. या यात्रेमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.यावेळी शिवसंग्राम पक्षाचे आ. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली