फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्या अन्यथा आंदोलन ! पालकांचा एल्गार

फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्या अन्यथा आंदोलन ! खासगी शाळांविरुद्ध पालकांचा एल्गार
Agitation
AgitationCanva
Updated on

आम आदमी पालक युनियन या बॅनरखाली एकत्रित आलेल्या विविध शाळेतील पाल्यांच्या पालकांनी खासगी शाळांविरुद्ध आवाज उठवला आहे.

सोलापूर : कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकली शाळा सुरू नसतानाही खासगी शाळा शंभर टक्के फी वसुलीसाठी पालकांना सतावत आहेत. याविरुद्ध आम आदमी पालक युनियन (Aam Aadmi Palak Union) या बॅनरखाली एकत्रित आलेल्या विविध शाळेतील पाल्यांच्या पालकांनी खासगी शाळांविरुद्ध आवाज उठवला आहे. फीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली नाही तर तीव्र आंदोलन (Agitation) करण्यात येईल, असा इशारा पालक युनियनचे अध्यक्ष रॉबर्ट गौडर, ऍड. शर्वरी रानडे व आश्‍विनी कुलकर्णी यांनी दिला आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. (Give fifty percent discount in fees otherwise parents warned private schools to agitate)

Agitation
शिक्षणमंत्र्यांची नुसतीच घोषणा ! मुलांच्या फीमाफीसाठी पालकांचा तंटा

सलग दुसऱ्या वर्षी शाळा ऑनलाइन सुरू आहेत. संस्था चालकांना पूर्ण वेळ शाळा सुरू नसल्याने शाळेच्या देखभालीचा खर्च कमी आहे. शिक्षकांचे पगार कमी करण्यात आले आहेत. असे असताना विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के फी वसुलीची सक्ती करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पालाकांना मोबाईल बिलासह मोबाईल खरेदीचा भुर्दंड बसत आहे. फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्‍लासला जॉइन केले जात नाही. शाळांची फी व मोबाईल खर्च यामुळे पालकांचे कंबरडे मोडले आहे. यासाठी शाळांनी फीमध्ये पन्नास टक्के सवलत द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Agitation
सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

न्यायालयाचा निकाल; पण अंमलबजावणी नाही

खासगी शाळांचे संस्थापक व पालक यांचे वाद देशभर सुरू आहेत. यापूर्वी ठिकठिकाणी न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने खासगी शाळांनी फीमध्ये किमान दहा ते तीस टक्के सवलत द्यावी, असा निकाल दिला आहे. मात्र, या निकालाची अंमलबजावणी करण्याबाबत परिपत्रक शाळांना मिळाले नसल्याचे खासगी शाळांचे संस्थापक सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com