पारोळ्यातील युवतीला न्याय द्या, राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

logo

या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, महिला आरोपीसह अन्य आरोपींना तत्काळ अटक करावी. संबंधित स्थानिक पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, निकाल लागेपर्यंत आरोपींना जामीन देऊ नये, मुलीच्या कुटुंबाचे संरक्षण मिळावे आणि पुनर्वसन करावे या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

पारोळ्यातील युवतीला न्याय द्या, राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : टोळी (ता. परोळा, जि. जळगाव) येथील 20 वर्षिय तरुणीवर अत्याचार करून विष पाजून तिची निघृण हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सोलापूर शाखेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्या युवतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. 

 यावेळी मार्गदर्शक संजय शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, जिल्हा अध्यक्ष अजय राऊत, प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष राम कबाडे, शहर अध्यक्ष परशुराम मब्रुखाने, गणेश तुपसमुद्रे, जिल्हा सचिव वसंत कांबळे, तानाजी जाधव, रमेश कांबळे, धनराज शिंदे, ईस्माइल हुलसूरे, राजेंद्र कांबळे, संतोष कासे, लक्ष्मण चाबुकस्वार, अरविंद तळे, परशुराम वनके, अक्षय कांबळे, गणेश शिलेदार, ज्योतीराम कांबळे, तानाजी कांबळे, रमेश गायकवाड, संजय थोरात, सागर टोणपे, गौराबाई कोरे, मारता आसादे, कविता कोडवान, काशिनाथ काळे, विठ्ठल वनस्कर, तुकाराम चाबुकस्वार, सचिन ईरवाडकर, लक्ष्मण कांबळे, शिवाजी राजगुरू, वैभव कांबळे, उमेश वाघमारे, दादा बनसोडे, पवनकुमार जवंजाळ, आनंद सोनटक्के यांच्यासह जिल्ह्यातील चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top