डिसले गुरुजींच्या 'ग्लोबल' पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह!

ग्लोबल टीचर खूपच अडचणीत सापडले आहेत.
Ranjit singh Disley Guruji
Ranjit singh Disley GurujiTeam eSakal
Updated on
Summary

गेले काही दिवस डिसले गुरुजी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

सोलापूर : आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटल्यानंतर 'ग्लोबल' झालेले रणजितसिंह डिसले (Ranjit singh Disley) यांचे विमान हवेतून खाली आलेच नाही. ग्लोबल झालेले डिसले हे सेलेब्रिटी (Celebrity) झाले. अधिकाऱ्यांचे कॉल न घेणे, शाळेकडे दुर्लक्ष, 'डायट'वर प्रतिनियुक्ती देऊनही तीन वर्षांत तिकडे न जाणे, तरीही गेल्याचे खोटे सांगणे, शालेय शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाच्या परस्पर राज्यपालांना शाळेवर निमंत्रण देऊन प्रशासनाची कोंडी करणे, शाळेपेक्षा अमेरिकेत जाण्याच्या तयारीसाठी अधिक वेळ देणे आणि आता रजेचा अर्धवट अर्ज देऊनही त्याचे खापर प्रशासनावर फोडून पैसे मागितल्याचा आरोप करणे, अशा बाबींमुळे ग्लोबल टीचर (Global Teacher) खूपच अडचणीत सापडले आहेत. आता शेवटी त्यांच्या पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

Ranjit singh Disley Guruji
पुरस्कार विजेते डिसले गुरुजी पुन्हा वादात; RTI कार्यकर्त्याचा आक्षेप!

रजेच्या अर्ज दिड महिने प्रलंबित ठेवला, माझ्याकडून अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, या आरोपांचा पुराव्यानिशी खुलासा करण्यासंबंधीचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांना दिल्यानंतर त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा मागे लागला. माध्यमाशी बोलताना काहीतरी चुकल्याची जाणीव डिसले गुरुजींना उशिरा का होईना, पण झाली आणि त्यांनी झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे माफीनामा दिला. तरीही, दोन्ही आरोपांचा पुराव्यानिशी खुलासा केल्याशिवाय त्यांची सुटका नाहीच, असे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागाला (झेडपी सीईओ, शिक्षणाधिकारी) अंधारात रणजितसिंह डिसले यांनी ग्लोबल टिचर अॅवार्डसाठी (Global Teacher Award) अॅप्लिकेशन केले. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा जगभरात नावलौकिक झाला आणि त्यामुळे झेडपी प्रशासनाला गप्प बसावे लागले. मात्र, अधिकाऱ्यांच्या कॉलला प्रतिसाद न देणे, "डायट'कडे प्रतिनियुक्‍ती असतानाही ना शाळा ना "डायट'कडे त्यांची उपस्थिती, शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता रजेची मागणी करणे, मुख्याध्यापकांच्या परस्पर शाळेतून बाहेर जाणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या परस्पर राज्यपालांना त्यांच्या शाळेवर निमंत्रित करणे, अशा अनेक गोष्टींमुळे त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.

Ranjit singh Disley Guruji
Global Teacher वादाच्या भोवऱ्यात; सोलापूर ZP मध्ये डिसले गुरुजींचा निषेध

तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या माध्यमातून झालेल्या चौकशी अहवालावर आता कारवाई करण्यासंदर्भात विद्यमान शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रजेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे येणे अपेक्षित असताना ग्लोबल टिचर डिसले यांनी थेट सीईओंची भेट घेतली. त्यांना कॉल केला, त्यावेळी त्यांनी कॉल घेतला नाही. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना ते सेलेब्रिटी असल्याची जाणीव झाली. तेवढ्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या आरोपामुळे ते चांगलेच कचाट्यात सापडले. शिक्षण विभागावरील आरोपांबाबत तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस त्यांना बजावली. तरीही, आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचेही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. परंतु, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कॉलला प्रतिसाद न देणाऱ्या ग्लोबल टिचरच्या घरी खुलासा करण्याची नोटीस पोहोच झाली. आता त्यांना तीन वर्षांचे वेतन कसे दिले गेले, याची चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, स्वतःहून अडचणीत सापडलेल्या डीसले गुरुजींना प्रशासनाने विचारलेल्या प्रत्येक मुद्द्यांवर पुराव्यानिशी उत्तर द्यावे लागणार आहे. यासंदर्भात डिसले गुरुजींशी संपर्क साधला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

32 महिन्यांचे वेतन वसूल होणार?

चिमुकल्यांचे शिक्षण सुलभ व्हावे म्हणून डिसले गुरुजींनी क्‍युआर कोडची शिक्षण पध्दती विकसीत केली. त्यांच्याकडील ज्ञान व माहितीचा उपयोग इतरांनाही व्हावा म्हणून त्यांना "डायट'वर प्रतिनियुक्‍ती मिळाली. तीन वर्षांत ते "डायट'कडे आलेच नाहीत, असे तेथील प्राचार्य डॉ. कोरडे यांनी प्रशासनाला कळविले आहे. या काळात ते परितेवाडी शाळेतही गेले नाहीत. त्याच दरम्यान त्यांनी ग्लोबल टिचर पुरस्काराच्या तयारीसाठीच अधिक वेळ घातल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. दरम्यान, 32 महिन्यांनी "डायट'कडे ते येत नसल्याचे समजताच त्यांचे वेतन काढणे थांबविले होते, असे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही, ते दोन्ही ठिकाणी नसतानाही 32 महिने वेतन दिलेच कसे, याचा तपास सुरु झाला आहे. त्याअनुषंगाने कुर्डूवाडीचे गटशिक्षणाधिकारी व त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यासंदर्भातील फाईल सीईओ स्वामी यांच्याकडेच आहे.

Ranjit singh Disley Guruji
डिसले गुरुजींचा सत्कार कोणत्या आधारावर

ग्लोबल टिचर डिसले गुरुजींची "डायट'वर प्रतिनियुक्‍ती असताना ते तिकडेही गेले नाहीत, तरीही त्यांनी 32 महिने वेतन घेतले. रजेचा अर्ज अपूर्ण असतानाही त्यांनी स्वतःची चूक बाजूला ठेवून प्रशासनावर त्याचे खापर फोडले. या दोन्ही बाबींवर सध्या चौकशी झालीय. पुरस्कारावेळी डीसले गुरुजींनी दिलेली माहिती अमेरिकेतील त्या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात काही चुकीची माहिती दिल्याचे दिसते. त्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी तक्रारी केल्या आहेत. पण, त्यासंदर्भात कुणाकडूनही चौकशीचे आदेश नाहीत अथवा आम्ही पण त्याची चौकशी सुरू केलेली नाही. भविष्यात वरीष्ठ स्तरावरून आदेश मिळाल्यानंतर त्याची चौकशी होईल.

- दिलीप स्वामी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

पुरस्कारासाठी सादर केलेल्या ठळक बाबी...

- आमची शाळा परीतेवाडी ही आदिवासी भागात आहे

- बहुतेक मुले कन्नड भाषिक असून त्यांच्यासाठी मी कन्नड शिकलो

- याठिकाणी बालविवाहाचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत होते, प्रबोधनातून ते खूप कमी केले

- मुलांमधील शिक्षणाची गोडी वाढली आणि शाळेत मुलींचे प्रमाण वाढले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com