Global Wari
sakal
माढा - महाराष्ट्राच्या वारी परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने लंडनहून निघालेल्या 'ग्लोबल वारी'च्या पादुकांनी ११ देशांतील ५० दिवसांचा प्रवास पूर्ण करून पंढरपूरातील श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सोमवारी माढ्यातील कसबापेठेतील श्री विठ्ठल मंदिरात आगमन केले. मंदिरातील विठ्ठलाच्या चरणी पादुका ठेवून पूजा करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली.