
सोलापूर : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून ई-मेल व मेसेजचा पर्याय निवडणाऱ्या लघुदाब ग्राहकांचा महावितरणच्या गो-ग्रीन योजनेतील सहभाग सध्या पाच लाखांवर पोचला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक दोन लाख एक हजार २३३ ग्राहक योजनेचा लाभ घेत असून, त्यांना दरवर्षी दोन कोटी ४२ लाख रुपयांचा वीजबिलात फायदा होत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ६० हजारांवर ग्राहक आहेत.