
सोलापूर : गोव्याहून शनिवारी सायंकाळी सोलापूरला येणारे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले. यामुळे सोलापूरहून गोव्याला जाणारे ५९ प्रवासी निराश होऊन विमानतळावरून परतले. तर गोव्यात सुमारे ४० प्रवाशांना पर्यायी मार्ग निवडावा लागला. सोलापूर विमानतळावर नाईट लॅंडिगची सोय नसल्याने उशिरा उड्डाण करणे शक्य झाले नसल्याचे विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.