
सोलापूर : मंगळवेढा येथील शरद नगरातील घराशेजारील तारेच्या कंपाउंडमधील दोन शेळ्या व दोन बोकडे चोरीला गेल्याची फिर्याद औदुंबर मलकप्पा गोडसे (रा. शरदनगर, ता. मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलिसांत दिली. १८ जूनच्या पहाटे ही चोरी झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. गोडसे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या शेळ्या-बोकडांवर होता. त्याची व्यथा त्यांनी पोलिसांसमोर मांडली. पोलिस नाईक दुधाळ तपास करीत आहेत.