
Solapur News: सोन्याचे भाव सातत्याने वाढत असताना या बाजारातील अनिश्चितता वाढली आहे. अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या विविध निर्णयांचे परिणाम वाढले आहेत. या स्थितीत २४ कॅरेट सोन्याचे भाव एक लाखावर पोचू शकतात असे अंदाज सोने व्यापारी व्यक्त होत आहेत. दुसरीकडे चांदीच्या भावाने शनिवारी (ता. १५) एक लाखाचा टप्पा गाठला आहे.