
सोलापूर: विड्या वळण्याचे काम करुन कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलेने हौस म्हणून साडेतीन तोळ्याचे दोन लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दोन पदरी गंठण घेतले होते. बुधवारी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गंठण हिसकावून नेले आहे. दुसरीकडे कुर्डुवाडीतील रूबी स्टार हॉस्पिटलसमोरून घराकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेले आहे. दोन्ही घटनांची पोलिसांत नोंद झाली आहे.