मोहोळ - मोहोळ येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या रुद्राक्ष माळेतील सोन्याच्या 90 हजार रुपये किमतीच्या 18 सोन्याच्या चकत्याची चोरी झाल्याची घटना ता. 25 जून ते 15 जुलै दरम्यान सकाळी अकरा वाजण्यापूर्वी घडली. या संदर्भात मोहोळ पोलिसात देवस्थान पंचकमिटीने खबर दाखल केली आहे.