
सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपेकी एक असलेल्या अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, भांडी खरेदीचा योग नागरिक आवर्जून साधतात. त्यासाठी शहरातील बाजारपेठांनी विविध आकर्षक सवलती आणि योजना जाहीर केल्या असून, त्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.