

Wrestler Kishor Pawar Clinches Gold for India in Malaysia
Sakal
-भारत नागणे
पंढरपूर : मलेशिया येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा पैलवान किशोर पवार याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मलेशिया येथे इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप( २०२६) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत ५७ किलो वजनी गटातून फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात पैलवान किशोर पवार याने श्रीलंका, मलेशिया,थायलंड देशाच्या पैलवानांना धूळ चारत सूवर्णपदक पटकावले.