

Pune–Solapur Rail Route to Get Speed Boost, Travel Time to Reduce
Sakal
-प्रसाद कानडे
पुणे : पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्या आता ताशी १६० किलोमीटर वेगाने धावतील. कारण मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे- सोलापूर- वाडी स्थानकादरम्यान ट्रॅक अपग्रेडेशनसह ‘स्कॉट ट्रान्सफॉर्म’चे (३ फेजमधून वीज संतुलित पद्धतीने २ फेजमध्ये बदलणे) काम हाती घेतले आहे. यामुळे रेल्वे गाड्यांना होणारा विद्युतपुरवठा हा अधिक क्षमतेचा होईल. वीज गळतीची देखील समस्या राहणार नाही. परिणामी रेल्वे गाड्या ताशी १६० किमी वेगाने धावतील. सध्या या मार्गावर रेल्वे गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावत आहे. गती वाढल्यानंतर पुणे- सोलापूर रेल्वे प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे.