

Ujani dam filled to full capacity, bringing relief and hope to farmers.
Sakal
सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात उजनीतून ११२ टीएमसी पाणी भीमा नदीतून सोडून द्यावे लागले. आता पावसाळा संपून अडीच महिने झाले आहेत. सध्या उजनी धरण १०० टक्के भरलेले असून धरणात सध्या ११७ टीएमसी पाणी आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी १५ जानेवारीनंतर रब्बी पिकांसाठी पहिले आवर्तन सोडले जाणार आहे.