गुड न्यूज... सातव्या वेतन आयोगाचा फरक रोख मिळणार...! 

गुड न्यूज... सातव्या वेतन आयोगाचा फरक रोख मिळणार...! 
Updated on

सोलापूर ः राज्यातील ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते व नवीन परिभाषित अंशदान योजनेची खाते नसतील, अशा शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पाच समान हप्त्यांमध्ये देण्याचे आदेश शासनाने राज्यातील वेतन पथकाच्या अधीक्षक दिले आहेत. 

राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू केला आहे. असा प्रत्यक्ष आदेश एप्रिल 2018 मध्ये शासनाने काढला होता. जानेवारी, फेब्रुवारी 2019 च्या वेतनातील फरक रोखीने अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु, जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीतील वेतनातील फरक देण्याबाबत स्पष्ट आदेश दिले नव्हते. 10 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयाने शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना फरकाची एकूण रक्कम समान पाच हप्त्यामध्ये पाच वर्षात देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, भविष्य निर्वाह निधी व डीसीपीएसची खाती नसलेल्या अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्याबाबत आदेश नव्हते. याबाबत राज्याच्या संचालकांनी अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांनाही हा फरक रोखीने पाच समान हप्त्यात पाच वर्षात देण्याचे आदेश राज्यातील सर्व वेतन पथकाच्या अधीक्षकांना पत्राद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

पाच हप्त्याऐवजी एकरकमी द्या 
अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाची मिळणारी फरकाची रक्कम ही अल्प आहे. पाच समान हप्त्यामध्ये ती देण्यास सांगितले आहे. मात्र, त्याऐवजी ही रक्कम एकरकमी मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Solapur
Dr. Shirish Valsangkar family's
NEET Exam
Marathi News Esakal
www.esakal.com