
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी येणाऱ्या सुमारे एक हजार ८० दिंड्या आणि पालख्यांना राज्य सरकारने जवळपास दोन कोटी १६ लाख रुपयांचे अनुदान वाटप केले आहे. अनुदान मिळाल्याने दिंड्यांचा पंढरीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे, अशी माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील महाराज यांनी दिली.