
सोलापूर : आई-वडील शेतकरी, दोन भाऊ शिकतात, कुटुंबातील मोठ्या मुलाला मेहनतीच्या बळावर सरकारी नोकरी लागली. आई-वडिलांसह त्याच्या भावांनी आनंदात गावात पेढे वाटले. मात्र, दोन वर्षांतच तो तरुण लाच प्रकरणात अडकला. शंकर अरुण बजबळकर (वय ३०, रा. तिप्पेहळ्ळी, ता. सांगोला) असे त्या संशयिताचे नाव. मुलगा नोकरीला लागल्याच्या आनंदातील त्या आई-वडिलांसह त्याच्या भावांना शरमेने मान खाली घालावी लागली आहे.